आम्ही कोण


 
"पुणे, अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे ही थोरा, संतांची, आणि राजे, पेशव्यांची पुण्यभूमि. मराठी संस्कृतीचा पाया याच पुण्यात रोवला गेला. विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणा-या या सांस्कृतिक राजधानीतील गणेशोत्सव तर जग प्रसिद्ध.
अशा या मराठी संस्कृतीचा पाया असलेल्या पुण्यात आणि पुण्याचा मानबिंदु असलेल्या गणेशोत्सवात, स्पीकर्स च्या मोठ मोठ्या भिंती उभारून त्यापुढे मद्य धुंद होउन धिंगाणा घालणार्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसते. अशा या संस्कृती भक्षकांच्या, या आसुरी प्रवुत्तिस आवर घालणे अत्यंत अत्यावश्यक आहे, ही निकड लक्षात घेवून पारंपरिक वाद्ये असलेल्या ढोल-ताशा इ. वाद्यांचा वापर श्रीं च्या मिरवणुकांसाठी होऊ लागला आहे.
                   अगदी हाच विचार नजरे समोर ठेवून शिवप्रताप प्रतिष्ठान या ढोल पथकाची स्थापना करण्यात आली आहे. श्रीं च्या सेवेसाठी आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ सुरु करण्यात आलेल्या आपल्या प्रतिष्ठान चे यंदाचे 7 वे वर्ष."

No comments:

Post a Comment